Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 172

युवती विभाग

$
0
0

ज्ञान प्रबोधिनी

युवती विभाग

‘संघटन हे सर्व देशप्रश्नांसाठीचे योग्य उत्तर आहे’ ही भूमिका ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे. त्याच भूमिकेने युवतींचे संघटन करण्यासाठी युवती विभाग काम करतो. युवती विभाग म्हणजे वय वर्षे १० ते ६० मधील ‘युवतींसाठी’ संघटनात्मक रचना! १९६४ पासून युवतींच्या संघटनाची सुरुवात स्वतः प्रबोधिनीचे आद्य संचालक संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी तेव्हाच्या युवती कार्यकर्त्यांबरोबर केली. त्यानंतरच्या काळात युवागटासाठी ‘युवती विभाग’, मध्यमवयीन स्त्रियांसाठी ‘संवादिनी’ गट तसेच ज्येष्ठ महिला सदस्यांसाठी ‘जिजामाता दल’ कार्यरत आहे.

युवती विभागाद्वारे ‘संघटना हे सूत्र बनावे’ या उद्देशाने स्वयंप्रेरणेच्या तत्त्वावर आधारित गटबांधणी केली जाते. यासाठी विविध वयोगटातील व विषयांभोवती गुंफलेल्या दलांच्या माध्यमातून काम होते. या दलांमध्ये स्वतःचे शिक्षण/ नोकरी/ व्यवसाय सांभाळून स्वतःच्या, समाजाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या युवतींचा समावेश होतो. विभागातून नियमित व प्रासंगिक कामांच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयीन युवतींच्या सर्वांगीण विकसनासाठी म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आणि गटात एकत्र काम करता येण्याच्या गुणांच्या विकसनासाठी तसेच नेतृत्व विकसनासाठी योजना केली जाते.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात चालू असलेली नियमित दले:-

(१) शालेय वयोगटासाठी भरणारी दले-

१.१ प्रशालेय दले- सोमवार ते शुक्रवार ५:४५-७:००

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथील इयत्ता पाचवी ते दहावीतील २४० विद्यार्थिनींसाठीचे उपक्रम. मुख्यतः क्रीडा हे माध्यम दलासाठी घेतले जाते आणि गटात काम करण्याचे गुण तसेच नेतृत्वगुणांचे विकसन करण्यासाठी दैनंदिन उपक्रमांची योजना केली जाते. त्यामध्ये दैनंदिन व प्रासंगिक उपक्रम- क्रीडा शिबिरे, ग्रामीण परिचय शिबिरे, इतिहास अभ्यास शिबिरे, सहली, वारी, गणेशोत्सव व अन्य सार्वजनिक उत्सवांतील सहभाग तसेच संचलन, पद्यगायन, विविध वैचारिक व नैमित्तिक विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि गटकार्ये असे उपक्रम योजले जातात.

संपर्क : गार्गी देवचके – ९४२०८८८६५३

१.२ प्रबोध शालेय दल- साप्ताहिक वारंवारितेने हे दल दर शनिवारी ज्ञान प्रबोधिनी भवन येथे भरवले जाते.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेव्यतिरिक्त अन्य शाळांतील मुलींसाठी चालणारे दल, ज्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी विविध उपक्रम योजले जातात. त्याअंतर्गत मुख्यतः गटकार्य, गटचर्चा, व्यायाम-खेळ, कला-प्रशिक्षण अशा माध्यमांचा उपयोग होतो.

संपर्क : ऋचा जोशी – ९१४५६६०४१२

१.३ विज्ञान दल- सध्या पाक्षिक वारंवारितेने हे दल नियमितपणे ज्ञान प्रबोधिनी भवन येथे भरवले जाते.

प्रामुख्याने विज्ञानाच्या माध्यमातून संघटन व्हावे यासाठी हे दल भरणार आहे. याअंतर्गत मुलींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात व विज्ञान-अभ्यासाची व प्रकल्पाची पद्धत शिकवली जाते.

संपर्क : श्रद्धा केळकर – ९८२२५१५५२८

(२) महाविद्यालयीन व पदव्युत्तर (व्यावसायिक) युवतींसाठी भरणारी दले-

२.१ अहिल्याबाई होळकर युवती दल- साप्ताहिक वारंवारितेने हे दल दर शनिवारी ज्ञान प्रबोधिनी भवन येथे भरवले जाते.

महाविद्यालयीन (व व्यावसायिक) युवतींचे संघटन या दलाद्वारे होते. या दलामागील उद्दिष्टे-

अ. युवतींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे.

आ. युवतींच्या शारीरिक क्षमता ओळखणे आणि ताणणे.

इ. युवतींचे वृत्तीघडण तसेच गटात काम करण्याचे गुण तसेच नेतृत्वगुणांचे विकसन होणे व त्यासाठी कौशल्य-प्रशिक्षण करणे.

ई. दलातील युवतींना प्रबोधिनी परिचय करून देणे.

या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कला, क्रीडा, विविध विषयांचा अभ्यास, चर्चा, कौशल्य विकसन अशा माध्यमातून उपक्रम दलांवर घेतले जातात.

संपर्क : केतकी भट – ७५८८२२८८१३

वरील विषयांच्या/ माध्यमांच्या व्यतिरिक्तही शालेय, महाविद्यालयीन व व्यावसायिक गटांतील युवतींनी एकत्र येण्यासाठी विविध उपक्रम वर्षभर व सुट्टीत योजले जातात. या सर्व उपक्रमात किंवा उपक्रमांच्या नियोजनात काही जबाबदारी घेऊन सहभागी व्हायचे असेल तर संपर्क साधू शकता. पुण्यात जसे काम चालते, तसेच प्रबोधिनीच्या अन्य केंद्रांवरही युवती संघटनाचे काम चालू असते. तरी सर्वांचे मनापासून स्वागत.

संपर्क:-

१. प्रज्ञा प्रभुदेसाई – अक्कलकोटकर : ८९८३४०१५०७

२. मेधाविनी वाटवे : ९४२३१६२१३४

The post युवती विभाग first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 172

Trending Articles