Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 170

हे ऋषिवर श्रीअरविंद

$
0
0
हे ऋषिवर श्रीअरविंद, हे चिन्मय मधुरा माते 
युवशक्ति हिंदुराष्ट्राची, वंदिते आज तुम्हाते ॥ ध्रु. ॥

वेड एक होते तुम्हा, मातृभूमिच्या मुक्तीचे
उग्र खड्ग झाला तुम्ही, जागृत भारतशक्तीचे
'व्हा सिद्ध संगरा', वदला, 'सांडूनि भ्रांति-मोहाते' ॥ १ ॥

द्रष्ट्या प्रतिभेने तुमच्या, स्वप्ने आम्हासी दिधली
'ही अखंड होइल भूमी, जरि खंडित आता दिसली,
संजीवन अध्यात्माचे, देईल तृषित विश्वाते' ॥ २ ॥

'हा हिंदुधर्म-हे राष्ट्र, अद्वैत असे उभयांचे
राष्ट्रार्थ तनुमने झटणे हे धर्माचरणचि साचे'
या धर्मसाधनेलागी, पथदर्शी तुमची चरिते ॥ ३ ॥

तनुतीर्थे शुचितम तुमची, की मूर्त अभीप्सा झाली
अतिमानस उतरुन आले, त्या पुण्यबलाने खाली
जड हलले-हसले-धाले ! लाहुनिया चैतन्याते ॥ ४ ॥

जगदंतरि आहा तुम्ही, चैतन्यस्वरूपी नटुनी
हृदयांतरि यावे अमुच्या, प्रेरणामंत्र होवोनी
अम्हि पथिक देवसंघाचे, द्या आशीर्वच आम्हाते ॥ ५ ॥

The post हे ऋषिवर श्रीअरविंद first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 170

Trending Articles