Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 155

१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन

$
0
0

आधुनिक मानसशास्त्र किंवा व्यवस्थापनशास्त्र भारतात येण्यापूर्वी नेतृत्वशक्ती म्हणजे आत्मशक्ती असाच भारतामध्ये विचार व्हायचा. आत्मशक्ती ही सर्व मानवांविषयी प्रेम अशा रूपात प्रकट होते. व्यवस्थापनशास्त्रातील सर्वात आधुनिक विचारानुसार Servant leadership हीच खरी leadership असे समजले जाते. इतरांविषयी प्रेमापोटी जो त्यांची सेवा करतो, तोच खरा नेता. अशी Servant leader ची कल्पना आहे.

            Servant leader बनण्याची आपल्यामधील प्रेरणा वाढण्यासाठी आपल्यामध्ये सेवेची प्रेरणा वाढायला हवी. आज तुमच्यापैकी काही जणांनी प्रतिज्ञा घेतली, ती राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा आहे. ‘मी आयुष्यभर राष्ट्रसेवा करत राहीन’ असे आपण म्हटले. तो विचार मनात सतत जपून ठेवला तर आपल्यामध्ये सेवेची प्रेरणा वाढत जाते. आपण स्वत:ला सेवेमध्ये जितके गुंतवून घेतो तितकी आपल्यामधील प्रेमशक्ती किंवा आत्मशक्ती किंवा नेतृत्वशक्ती म्हणजेच servant leadership वाढत जाते.

(सौर फाल्गुन २७ शके १९३७, दि. १६ मार्च २०१६ रोजीच्या

नेतृत्व संवर्धन केंद्राच्या प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रमातील भाषणाचा काही भाग)

*******************************************************************************************************************

The post १३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 155

Trending Articles