Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 92

स्पर्धा परीक्षा केंद्राची ओळख –डॉ. सविता कुलकर्णी

ज्ञान प्रबोधिनीचं स्पर्धा परीक्षा केंद्र १९९५ साली सुरू झालं. पहिलं उद्दिष्ट असं होतं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त स्वच्छ, कार्यक्षम आणि मूल्याधिष्ठित अशा प्रकारचा विचार करणारे अधिकारी जावेत आणि दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे की जे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत जातील तिथे त्या सगळ्यांचा एक उत्तम नेटवर्क तयार व्हावं. यूपीएससीचे वर्ग आपण प्राधान्याने घेतो, त्याचे एक सूत्र ठरवलेलं आहे. “Know Your Self, Know Your System, Know Your Society”. तसंच एक शिक्षणातील महत्वाचं तत्त्व आहे, ते म्हणजे तुम्ही जेव्हा कुठीलीही मार्गदर्शनाची योजना करता त्यावेळेला ‘ज्ञान, कौशल्य, क्षमता आणि वृत्ती’ अशा चार गोष्टींना तुम्हाला महत्व द्यावं लागतं. गेल्या ३० वर्षांच्या प्रवासामध्ये आपल्याकडून प्रशिक्षण घेतलेले साधारणतः १५०० विद्यार्थी (UPSC मध्ये यशस्वी) आज अधिकारी म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, देशाच्या सर्व राज्यांमध्ये, आणि सुमारे नऊ वेगवेगळ्या देशांमध्ये आज आपले विद्यार्थी हे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भविष्यामध्ये ‘Critical Thinking’ ची जास्तीत जास्त workshops घ्यावी, ‘Co-Apt’ म्हणजे ‘Competitive Aptitude Assessment Test’ अशी आपण संशोधनातून विकसित केलेली चाचणी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, म्हणजे आपला स्पर्धा परीक्षेचा निर्णय योग्य रीतीने घेतला जाईल, आणि आपलं अधिकाऱ्यांचं नेटवर्क अधिकाधिक कार्यक्षम, आणि vibrant व्हावं असा प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी योजना ठरवलेली आहे.
Instagram Source here.
Full video here.

Introduction to Jnana Prabodhini Competitive Examinations Center by Dr. Savita Kulkarni, in Marathi

The post स्पर्धा परीक्षा केंद्राची ओळख – डॉ. सविता कुलकर्णी first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 92

Trending Articles