JPCEC started its new year with an inspiring Varsharmabh Samarambh on July 13, 2024. We were happy to have Shri. Pankaj Deshmukh sir, IPS (2011 batch), Superintendent of Police, Pune Rural, as our chief guest. Shri. Deshmukh sir, gave his valuable insights on the importance of focus, JP training and experiences, balance of enjoyment and hardwork during preparation and being ready for any situation and problem. He also felicitated the students from JPCEC who successfully cleared the UPSC CSE in 2023. Dr. Savita Kulkarni and Dr. Vivek Kulkarni guided the students on importance of the meaning of Upasana and its reflection in the ‘Know Your Self, Know Your System, Know Your Society’ motto JPCEC, importance of staying connected, and the role of character in facing the challenging career in civil services.
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या नवीन वर्षाची सुरुवात अतिशय प्रेरणादायी अशा वर्षारंभ उपासनेने झाली. समारंभाला श्री. पंकज देशमुख, IPS (२०११ तुकडी), पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. उपासनेनंतर Complete Batch चे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकसनासाठीचे संकल्प वाचले गेले. श्री. देशमुख यांनी आजच्या माहिती आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा भडीमार होणाऱ्या काळात असलेले एकाग्रतेचे महत्त्व, प्रबोधिनीतील संस्कार, प्रशिक्षण, व वातावरण पूर्णपणे अनुभवण्याचे महत्त्व, परीक्षा तयारीच्या काळातील वेळ व मोकळेपणा करिअर मध्ये मिळत नसल्याने आनंद/मजा आणि अभ्यास याचा चांगला समतोल राखण्याची गरज, पोलीस दलात रोज येणारी आव्हाने यावर उद्बोधन केले. त्यांच्या हस्ते २०२३च्या UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. डॉ. विवेक कुलकर्णी यांनी केंद्राच्या अधिकारी mentoring उपक्रमाविषयी सांगितले व पाहुण्यांचे आभार मानले. डॉ. सविता कुलकर्णी यांनी उपासनेचा अर्थ आणि केंद्राच्या ‘Know Your Self, Know Your System, Know Your Society’ या सूत्रात त्याचा अंतर्भाव, संघटनेचे महत्त्व आणि शुद्ध चारित्र्याचे नागरी सेवेसारख्या आव्हानात्मक कारकीर्दीत महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
The post वर्षारंभ समारंभ १३ जुलै २०२४ first appeared on ज्ञान प्रबोधिनी.