या पद्याचे निरुपण लवकरच येथे येईल.
विकसता विकसता विकसावे ।। ध्रु. ।।
घडविता घडविता घडवावे
मिळविता मिळविता मिळवावे
विजयप्राप्त असे तळपावे ।। १ ।।
मन विशाल समृद्ध करावे
मन प्रफुल्लसदाचि हसावे
मन विवेकबळे उमलावे
मन त्वरे जनपदी रमवावे ।। २ ।।
तपविता तपविता तपवावे
तपपुनीत शरीर करावे
तपवुनी प्रतिभे उजळावे
तपगुणे मन मना मिळवावे ।। ३ ।।
झिजविता झिजवता झिजवावे
झिजुनी जीवनि महायश
घ्यावे तनु झिजो जगती
जणु चंदन मन बनो विजयी अतिपावन ।। ४ ।।
वितरता वितरता वितरावे
जनमनी विपुल ज्ञान करावे
जनप्रचोदित असे घडवावे
जन सुसंघटनार्थ विणावे ।। ५ ।।
भरडिता भरडिता भरडावे
रिपुजना भुइसपाट करावे
हटविता हटविता हटवावे
तुडविता तुडविता तुडवावे ।। ६ ।।
समकृती समकृती समकार्य
हृदयस्पंदन घडो मन एक
विमल हेतु स्फुरो नवनीत
विमल राष्ट्र घडो अभिजात ।। ७ ।।
The post अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ first appeared on ज्ञान प्रबोधिनी.